#Click_Point
सफर हे सुहानेच असतात .
जिंदगीचे असो वा भटकंतीचे .
भटकंती शीवायही नीत्याचेच येणे जाणे असलेल्या मार्गांवर काही निसर्ग स्थळे खुणावणारी असतात .
जीथे "Selfie Point" असं लिहावं लागत नाही .
जे स्वतःच एक "Click Point" म्हणवता येणारं .
क्षणभर दुचाकी रस्त्या बाजुला थांबवत त्या "टेंबी"वर पोहोचलो . छायाचीत्र घेण्याच्या
पूर्व परवानगी दरम्यान संवादात तीथल्या जोडप्यातील व्यक्तींची नावे समजली
श्री.रमेश चोरगे आणि सौ.कविता चोरगे .
आंब्याच्या झाडाखाली छोटीशी झोपडीवजा नीवार्याची जागा . पीण्यासाठी पाण्याने भरलेलं पाण्याचं मडकं , बसण्यासाठी काथ्यानी वीणलेलं बाजलं , वापरासाठी प्लॅस्टीकच्या मोठ्या कॅनमध्ये पाणी . त्यांच्या मुलानं अभिनव उपक्रम म्हणता येईल असं हस्तकलेतुन बनवीलेली सिमेंटची चुल . पावसाची झड मारुन मातीच्या जमिनीवर दल मारु नये म्हणुन पाघोळ्यां पुढे दोन म्हेडींच्या आधारे लावलेलं प्लॅस्टीक , प्लॅस्टीकवरुन पडणारं पाणी जमवीण्यासाठी
धार पडण्याजागीची जुनीपानी , चेपलेली , तुटकी फुटकी भांडी .
चोंढ्यातील या झोपडीभोवतालील मोकळ्या जागेत वलींतुन लावलेली काही आणि
आळ्या भोवतालील तुराटीच्या सुरक्षेतील काही बीयाणं . पलीकडे उरलेल्या जागेत पेरलेली मखमल , झेंडु .
तुर , गवार , भेंडी , वांगी यांसारखी भाजी घरच्यापुरता पीकवणारी ही जोडी .
"रातच्याला आलोच तर ; वाटलं तर झोपायचा नायतर नीसता फीरुन जायाचा !
तसा कोन हात नाय लावीत !"
सांगणारे रमेशबाबा आणि
वाढलेलं गवत बेणुन बीयाणांसाठी नवी जागा तयार करणार्या कविता आई .
जवळच असलेला पाण्याचा छोटासा प्रवाह
जो पुढे धबधब्यात बदलणार आहे .
पाणी , हीरवळ , मोकळी हवा , पाऊस
हेच तर आकर्षण असतं वर्षा सहलींचं .
मी पहात असलेल्या या निसर्गनीर्मीत सुंदर ठीकाणांवर कुठेतरी चार बाकडी टाकली जातात , चार रंगीबेरंगी झगमगत्या माळा सोडल्या जातात , जेवणाची सोय केली जाते , चुलीवरचं म्हणुन खायीसत सांगीतली जाते , काही परवानग्या मीळवील्या जातात काही वीना परवानाच चालु करतात .
गार्डन रेस्टाॅरंट , लाॅन या गोजीरवाण्या नावानी निसर्गाचंच नामकरण केलं जातं .
याचीच Pacakages , याचीच Online Bookings Social Sites वर जाहीरातींमधुन फीरतात आणि हाॅटेल्स नावारुपाला येतात .
नावरुप हे तर मालकाचं होतं पण
खरा मालक तर तो सृष्टी निर्माता
जो असे अज्ञात सुंदर देखावे निर्माण करतो .
जो नावारुपाचं धींडोरा नं पीटता
मनाला आनंद देऊन जातो
Click Point होऊन !
अभिजित अजितकुमार जंगम .
शब्दांगण .......