Tuesday, June 15, 2021

#Click_Point



#Click_Point 


सफर हे सुहानेच असतात .

जिंदगीचे असो वा भटकंतीचे .


भटकंती शीवायही नीत्याचेच येणे जाणे असलेल्या मार्गांवर काही निसर्ग स्थळे खुणावणारी असतात .

जीथे "Selfie Point" असं लिहावं लागत नाही .


जे स्वतःच एक "Click Point" म्हणवता येणारं .

क्षणभर दुचाकी रस्त्या बाजुला थांबवत त्या "टेंबी"वर पोहोचलो .  छायाचीत्र घेण्याच्या 

पूर्व परवानगी दरम्यान संवादात तीथल्या जोडप्यातील व्यक्तींची नावे समजली 

श्री.रमेश चोरगे आणि सौ.कविता चोरगे .


आंब्याच्या झाडाखाली छोटीशी झोपडीवजा नीवार्‍याची जागा . पीण्यासाठी पाण्याने भरलेलं पाण्याचं मडकं , बसण्यासाठी काथ्यानी वीणलेलं बाजलं , वापरासाठी प्लॅस्टीकच्या मोठ्या कॅनमध्ये पाणी . त्यांच्या मुलानं अभिनव उपक्रम म्हणता येईल असं हस्तकलेतुन बनवीलेली सिमेंटची चुल . पावसाची झड मारुन मातीच्या जमिनीवर दल मारु नये म्हणुन पाघोळ्यां पुढे दोन म्हेडींच्या आधारे लावलेलं प्लॅस्टीक , प्लॅस्टीकवरुन पडणारं पाणी जमवीण्यासाठी 

धार पडण्याजागीची जुनीपानी , चेपलेली , तुटकी फुटकी भांडी .


चोंढ्यातील या झोपडीभोवतालील मोकळ्या जागेत वलींतुन लावलेली काही आणि 

आळ्या भोवतालील तुराटीच्या सुरक्षेतील काही बीयाणं . पलीकडे उरलेल्या जागेत पेरलेली मखमल , झेंडु .


तुर , गवार , भेंडी , वांगी यांसारखी भाजी घरच्यापुरता पीकवणारी ही जोडी . 

"रातच्याला आलोच तर ; वाटलं तर झोपायचा नायतर नीसता फीरुन जायाचा ! 

तसा कोन हात नाय लावीत !" 

सांगणारे रमेशबाबा आणि

वाढलेलं गवत बेणुन बीयाणांसाठी नवी जागा तयार करणार्‍या कविता आई .

जवळच असलेला पाण्याचा छोटासा प्रवाह 

जो पुढे धबधब्यात बदलणार आहे .


पाणी , हीरवळ , मोकळी हवा , पाऊस 

हेच तर आकर्षण असतं वर्षा सहलींचं . 

मी पहात असलेल्या या निसर्गनीर्मीत सुंदर ठीकाणांवर कुठेतरी चार बाकडी टाकली जातात , चार रंगीबेरंगी झगमगत्या माळा सोडल्या जातात , जेवणाची सोय केली जाते , चुलीवरचं म्हणुन खायीसत सांगीतली जाते , काही परवानग्या मीळवील्या जातात काही वीना परवानाच चालु करतात .

गार्डन रेस्टाॅरंट , लाॅन या गोजीरवाण्या नावानी निसर्गाचंच नामकरण केलं जातं . 

याचीच Pacakages , याचीच Online Bookings Social Sites वर जाहीरातींमधुन फीरतात आणि हाॅटेल्स नावारुपाला येतात . 


नावरुप हे तर मालकाचं होतं पण 

खरा मालक तर तो सृष्टी निर्माता 

जो असे अज्ञात सुंदर देखावे निर्माण करतो .

जो नावारुपाचं धींडोरा नं पीटता 

मनाला आनंद देऊन जातो 

Click Point होऊन !


अभिजित अजितकुमार जंगम .

शब्दांगण .......