Wednesday, January 2, 2019

असतात का गं
माझ्या आठवणी तुझ्या मनात ?
तू , मी शरीराने दूर झाल्यावर
मनात साठलेल्या ...

डोळे बंद करुन केलेली
खोलवरची प्रदीर्घ चुंबने ,
आवेगानी मारलेल्या मीठ्या ,
अंगावरील परफ्युमच्या सुंगधासहीत ;
आठवणी मनाइतक्याच शरीरावरही राहीलेल्या ...

तुझ्या माझ्या भेटीच्या ठरलेल्या वेळेपासुनचा भेटीपर्यंतचा वेळ
नाही सरता सरत  आणि तुझ्या माझ्या एकांतातला सहवासाची वेळ मात्र नाही थांबता थांबत ...

तुझं डोकं उशीवर पडुन
चेहरा वर माझ्याकडे पहाणारा .
आतुरता आणि तृप्तीच्या भावांमध्ये
काळोखांतही मला तुझा चेहरा भिन्न भासणारा ...

तुझे डोळे शांत होत जातात
माझे श्वासही हळु हळु वेग मंदावतात . बदलत्या कुशीसोबत सुटणारे
उसासे अनं श्वास .
तीथेच सुरु होतो आपल्या चर्चांमध्ये
आपल्या पुढील एकांतातल्या भेटीची आस  .

चर्चा करता करता दोघांच्याही थकलेल्या देहासोबत डोळे बघता बघता आपोआप मीटुन जातात .
मगं तुझ्या माझ्या सोबत असतो खोलीत मंद प्रकाश आणि भिंतीवरील घड्याळाच्या टीक्क , टीक्क , टीक्क करत पुढे सरकणार्‍या काट्यांचा आवाज .

सकाळ झाली तरी
दोघेही असतो काल रात्रीसारखेच
एकमेकांच्या अजुनही कुशीत .
डोळे बंदच अनं आळसावल्या आवाजात पहीला उठणारा म्हणतो गुड माॅर्नींग "शोना" ! .
या या या सार्‍या
माझ्या , आपल्या आठवणी असतात का गं तुझ्या मनात ?
तू मी शरीराने दूर झाल्यावर
मनात साठलेल्या ?
जीतक्या मनावर तीतक्याच शरीरावरही राहीलेल्या ...

#शब्दांगण_अभिजित`स Words Word


No comments:

Post a Comment